कोरोना / राज्यातील रुग्ण 423 वर




माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली आहे. गुरुवारी एका दिवसात राज्यात तब्बल ८८ नवे पॉझिटिव्ह अहवाल आल्याने कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ४२३ वर गेली आहे. गुरुवारी मुंबईत दोन, तर पुणे व जळगावात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला. राज्यातील आतापर्यंत २० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ४२ जण बरे होऊ घरी परतले आहेत. गुरुवारी मुंबई व परिसरात सर्वाधिक म्हणजे ६३ कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. गुरुवारी मुंबईत ५४, पुण्यात ११, अहमदनगरमध्ये ९, औरंगाबाद २, तर सातारा, उस्मानाबाद, बुलडाणा आणि हिंगोलीतही प्रत्येकी एक नवीन रुग्ण आढळला आहे.

फक्त 12 तास उघडी राहणार मेडिकल आणि किराणा दुकान

लॉकडाउन दरम्यान किराणा दुकान आणि मेडिकलवर गर्दी वाढत होती. यावेळी सोशल डिस्टेंसिंगचे पालन केले जात नव्हते. यामुळे संसर्ग वाढण्याचा धोका होता. यामुळे आजपासून (शुक्रवार 3 एप्रिल) मेडिकल आणि किराणा दुकाने सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत सुरू राहणार आहेत. दरम्यान आवश्यकता भासल्यास ही दुकाने 24 तासांसाठी खुली केली जातील असे सरकारने आपल्या आदेशात म्हटले आहे. याप्रकरणी आदेशाचे उल्लंघन झाल्यास अन्न पुरवठा विभाग, एफडीए आणि पोलिस विभाग यांना कारवाईचा अधिकार असेल.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post