मराठमोळी अभिनेत्री अश्विनी भावेंनी केला हा व्हिडीओ शेयरमाय अहमदनगर वेब टीम
आज जागतिक वसुंधरा दिन आहे. 1970 पासून 22 एप्रिल हा दिवस जागतिक वसुंधरा दिन म्हणून जगभरातील 193 देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.पृथ्वीविषयीची कृतज्ञता आणि तिच्या संवर्धनाविषयी जाणीवजागृती व्हावी म्हणून हा दिवस साजरा केला जातो.
अभिनेत्री अश्विनी भावे यांनी त्यांच्या कॅलिफोर्नियातील घरी हा दिवस साजरा केला आहे. सध्या कोरोना विषाणुच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जग लॉकडाऊन आहे. अश्विनी भावेदेखील आपल्या कुटुंबासोबत क्वारंटाईन वेळ घालवत आहे. अशावेळी त्यांनी घरीच हा दिवस साजरा केला आहे.
अश्विनी यांना झाडांची विशेष आवड आहे. घरी फावल्या वेळात त्या त्यांचा बराचसा वेळ बागेत, झाडांसोबत घालवत असतात. झाडांची काळजी घेणं, त्यांचं संगोपन करणं हा त्यांचा आवडता छंद आहे. या खास दिनाचे औचित्य साधत त्यांनी त्यांच्या बागेमध्ये आंबा, पेरू यांची लागवड केली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post