नगर तालुक्‍यात शिवभोजन थाळी सुरु करण्‍यासाठी 30 एप्रिलपर्यत अर्ज करावे


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर –शासनाच्‍या निर्देशानुसार नगर तालुक्‍यात नोव्‍हेल कोरोना विषाणू प्रार्दूर्भावाच्‍या पार्श्‍वभूमीवीर गरीब व गरजू लोकांना अन्‍न मिळावे म्‍हणून शिवभोजन थाळी सुरु करण्‍यात येणार आहेत. इच्‍छूक असणा-या व्‍यक्‍तींकडून दिनांक 30 एप्रिल 2020 पर्यत तहसील कार्यालय, नगर येथे सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यत अर्ज मागविण्‍यात येत आहेत. या मुदतीनंतर प्राप्‍त झालेल्‍या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

इच्‍छूक व्‍यक्‍तीनी शिवभोजन थाळी सुरु करण्‍यासाठी अर्जासोबत हॉटेल , रेस्‍टॉरंट राज्‍य परवाना, अन्‍न व प्रशासन यांचा नोंदणी दाखला, आगप्रतिबंधक प्रमाणपत्र, वैद्यकीय अधिकारी यांचे प्रमाणपत्र, व्‍यवसायिक गॅस सिलेंडर प्रमाणपत्र व भोजनालय चालविण्‍याचे आवश्‍यक प्रमाणपत्र ही कागदपत्रे जोडणे आवश्‍यक आहे. शिवभोजन थाळी संदर्भात प्राप्‍त झालेल्‍या अर्जाची दिनांक 1 मे 2020 रोजी तालुकास्‍तरीय समितीकडून छाननी करुन पात्र अर्ज निवडण्‍यात येतील असे तालुका दंडाधिकारी तथा अध्‍यक्ष आपत्‍ती व्‍यवस्‍थापन, अहमदनगर यांनी प्रसिध्‍दी पत्रकान्‍वये कळविले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post