हॉटस्पॉट भाग वगळता 4 मे रोजी लाॅकडाऊन उठवण्यावर एकमत!


माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - कोरोनाबाधित हॉटस्पॉट भागात ३ मेनंतरही लॉकडाऊन राहील हे जवळपास निश्चित आहे, तर ग्रीन झोनमधील लॉकडाऊन उठवण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्र्यांत सोमवारी व्हीसीद्वारे झालेल्या बैठकीत सहमती झाली. बैठकीनंतर पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी म्हणाले की, बहुतेक मुख्यमंत्री ३ मेनंतरही लॉकडाऊन ठेवण्याच्या बाजूने आहेत. मात्र, त्यासोबतच हळूहळू आर्थिक कारभार सुरू करण्याचीही मागणी झाली. राज्या-राज्यांत रस्ते, रेल्वे आणि विमान वाहतूक ३ मेनंतरही बंद ठेवण्यावर सर्व मुख्यमंत्र्यांत एकमत दिसले. सूत्रांनुसार ग्रीन झोनमधील लॉकडाऊन सवलतींची घोषणा ३ मेनंतरच होईल. राज्यांनी स्थितीनुसार लॉकडाऊनच्या सवलतीबाबत धोरण ठरवावेेे. अर्थव्यवस्था सुस्थितीत असून घाबरण्याची गरज नसल्याचे या वेळी पंतप्रधानांनी सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post