छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार कोरोनाच्या लढाईत निश्‍चित बळ देतील : आ. संग्राम जगताप


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर : छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार समाजाला प्रेरणादायी आहे. त्यांनी अठरा पगड जातीला एकत्र करून
रयतेचे राज्य निर्माण केले आहे. आक्रमणांशी हिमतीवर एकहाती लढणारे आणि स्वाभिमानाचे राज्य निर्माण करणारे युगपुरुष ही छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख आहे. देशावर व राज्यावर कोरोना विषाणूने आक्रमण केले आहे. या आक्रमणांशी लढाई सुरु असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त एक प्रकारे त्यांच्या प्रबळ, संयमी आणि झुंजारवृत्तीची आठवण देऊन गेली. प्रत्येक आक्रमणावर नेस्तानुबूत करणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार कोरोनाच्या लढाईत निश्‍चित देशवासियांना बळ देईल. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून छत्रपतींचा आदर्श लक्षात घेऊन सर्वांनी जबाबदारीने वागावे, तिच खरी छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली ठरेल, असे आवाहन आ. संग्राम जगताप यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त माळीवाडा अश्वरुढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन
करताना आ. संग्राम जगताप. समवेत अफजल शेख उपस्थित होते. आ. जगताप पुढे म्हणाले की, देशावर आलेल्या या संकटाला सर्वांनी मिळून सामना करणे गरजेचे आहे. त्यासाठी
नागरिकांनी आपआपल्या घरात राहून प्रशासनास सहकार्य करत रहावे. तरच यातून आपण एक सामाजिक व जागृत नागरिक असल्याचे दिसून येईल, असे यावेळी बोलताना म्हणाले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post