प्रज्ञा शोध परिक्षेत सविता रमेश फिरोदिया प्रशालेचे दोन विद्यार्थी राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - नुकत्याच जाहीर झालेल्या राज्यस्तरीय प्रज्ञा शोध परिक्षेमध्ये नगरच्या शिशू संगोपन संस्थेच्या सविता रमेश फिरोदिया प्रशालेतील इयत्ता दुसरीतील दोन विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमध्ये येण्याचा मान मिळवला. चि.अमित राजू चौरे याने 150 पैकी 146 गुण मिळवत राज्यात तिसरा तर सुयश गणेश गाडे याने 150 पैकी 140 गुण मिळवत राज्यात 6 वा. येण्याचा बहुमान मिळविला अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका योगिता गांधी यांनी दिली.

या विद्यार्थ्यांना शिक्षिका मनिषा दुशिंग, वर्षा गोरे, जयश्री कोदे आदिंसह मुख्याध्यापिका योगिता गांधी यांचे मार्गदर्शन मिळाले.

या यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष शांतीलाल गुंदेचा, उपाध्यक्ष दशरथ खोसे, सचिव र.धों.कासवा, सहसचिव राजेश झालानी, विश्‍वस्त विजयकुमार मुनोत, दिपक गांधी, राजेंद्र गुंदेचा, चंद्रकांत अनेचा, रश्मी येवलेकर, संपतलाल मुथियान, अभय गांधी, संजय चोपडा, सीए रमेश फिरोदिया, एल.के.आव्हाड, बन्सी नन्नवरे, सुमन वारे, दिलीप गांधी, मनसूख पिपाडा, कांचन भळगट, प्रमोद गुगळे, मनसुखलाल गुंदेचा, शिवनारायण वर्मा आदिंनी अभिनंदन केले.

मुख्याध्यापिका योगिता गांधी यांनी सांगितले की, शाळेच्यावतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. स्पर्धा परिक्षांमध्ये त्यांना बसवून त्यांच्याकडून विशेष वर्गाद्वारे अभ्यास करुन घेतले जातात. त्यामुळे अनेक स्पर्धा परिक्षेत शाळेचे विद्यार्थी चमकत आहेत. प्रज्ञा शोध परिक्षेत शाळेचे दोन विद्यार्थी आले असल्याने शाळेची परंपरा कायम आहे. संस्थेचे पदाधिकारी व शिक्षकांच्या सहकार्याने विद्यार्थी प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post