गुटखा, पानमसाल अड्ड्यावर छापा ; 25 हजारांचा माल जप्त


माय अहमदनगर वेब टीम
पारनेर - येथे गुटखा, पानमसाल इ.तंबाखूजन्य असणाऱ्या ठिकाणीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून २५ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केले.

बेकायदेशीर गुटखा, पानमसाल इ.तंबाखूजन्य पदार्थ सिरज लतिफ इनामदार ( रा.रानमळारोड, कान्हूरपठार, ता.पारनेर) हा विक्री करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिलीप पवार यांना मिळाली. त्या माहितीवरुन इनामदार याच्या घरी छापा टाकून गुटखा, पानमसाल इ.तंबाखूजन्य पदार्थ जप्त केला. सिरज इनामदार याला पुढील कारवाई साठी पारनेर पोलीसांच्या ताब्यात दिले.
जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अपर जिल्हा पोलिस अधीक्षक सागर पाटील, नगर ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिलीप पवार यांच्या सूचनेवरून पोहेकाँ दत्तात्रय गव्हाणे, पोना संतोष लोंढे, रविंद्र कर्डिले, पोकाँ प्रकाश वाघ, सागर सुलाने, सागर ससाणे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post