अहमदनगरकरांना दिलासा ; जिल्ह्यातील २८ व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - जिल्हा रुग्णालया आणि प्रवरा ग्रामीण रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे गुरुवारी पाठविलेल्या २८ व्यक्तींच्या घशातील स्त्राव चाचणी अहवाल आज रात्री प्राप्त झाले. हे सर्व अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर यांनी दिली. तसेच आज आणखी १४ व्यक्तींच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले आहेत.

आज निगेटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये जामखेड, नगर आदी ठिकाणच्या व्यक्तींच्या अहवालाचा समावेश आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post