अहमदनगरमधील दोन कोरोना बाधितांना डिस्चार्ज ; आत्तापर्यंत 20 जण ठणठणीत


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - जिल्ह्यात लोणी (ता. राहाता) आणि मुकुंदनगर (नगर शहर) येथील दोन कोरोना बाधित्तांचा १४ दिवसानंतर दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना आज बूथ हॉस्पीटल मधून डिस्चार्ज देण्यात आला. आज दुपारी त्यांना बूथ हॉस्पिटल मधून हॉस्पिटल देखरेखीखाली लोणी आणि नगर शहरातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले.या दोन्ही रुग्णांची तब्बेत चांगली असल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणेने स्पष्ट केले.

दरम्यान आतापर्यंत जिल्ह्यातील ३१ कोरोना बाधितपैकी २० जण बरे झाले आहेत. तर, कोपरगाव येथील एक व जामखेड येथील एक अशा दोन जणांचा मृत्यु झाला आहे. सध्या येथील बूथ हॉस्पिटलमध्ये ९ जणांवर उपचार सुरू आहेत. त्यामध्ये नेवासा येथील दोन, जामखेड येथील दोन, आलमगीर (ता.नगर) येथील तीन, आष्टी (जि.बीड) येथील एक व आयव्हरी कोस्ट येथील एक परदेशी नागरिक यांचा समावेश आहे.

जिल्ह्यात बारा मार्चला पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळल्यानंतर मार्चचा शेवटचा आणि एप्रिलचा पहिला आठवडा रुग्ण वाढीचा ठरला. आरोग्य विभागतर्फे नागरी आणि ग्रामीण अशी विभागणी करण्यात आलेली आहे. नगर तालुक्याच्या विचार करता महानगरपालिका हद्द व तालुक्यातील आलमगीर येथे मिळून आतापर्यंत ११ रुग्ण आढळले असून यापैकी ८ जण बरे झाले असून त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिला आहे. तर, तीन जणांवर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, आज आणखी २६ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून हे सर्व अहवाल निगेटिव्ह असल्याची माहितीही त्यांनी दिली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post