राज्यात पुण्यात रुग्णांची संख्या सर्वाधिक ९ वर, तुकाराम महोत्सव, बँकिंग ऑडिट परिषद स्थगित
माय अहमदनगर वेब टीम
पुणे - शहरामध्ये कोरोनाचे एकूण ९ रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. अमेरिकेहून १ मार्च रोजी पुण्यातील नागरिक परत आला होता. त्याची तपासणी ११ मार्च रोजी करण्यात आली, ती पॉझिटिव्ह आली. त्यामुळे कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या ९ वर गेली आहे. दरम्यान, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संत तुकाराम महोत्सव, बँकिंग ऑडिटवरील राष्ट्रीय परिषद तसेच दि. १५ मार्च रोजी होणारे जागतिक ग्राहक दिनाचे कार्यक्रम रद्द करण्यात आले .
पुणे शहरातील ज्या भागातून काेराेना रुग्ण आढळले अाहेत त्या रुग्णांचे वास्तव्य असलेल्या घराचे आजूबाजूला जीपीएसच्या मदतीने तीन किलाेमीटर सीमानिश्चिती करून त्यामध्ये घराेघरी जाऊन आराेग्य विभागामार्फत सर्वेक्षण केले जाणार आहे. जे संशयित रुग्ण आढळून येतील त्यांना रुग्णालयात नेऊन त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहेत, तर पाच किलाेमीटरचे परिक्षेत्र बफर झाेन घाेषित करून तेथीलही सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
Post a Comment