पायाला आढी मारून बसू नये, होऊ शकता आजारी


माय अहमदनगर वेब टीम
हेल्थ डेस्क - पायांवर आढी मारून बसण्याची सवय बऱ्याच शारीरिक समस्यांना कारणीभूत ठरू शकते. आपल्यालाही अशीच सवय असेल वेळीच ती बंद करा, नाहीतर आजारी होण्याची शक्यता असते.

ब्लड सर्कुलेशन प्रभावित
क्रॉस पाय करून बसल्याने रक्त परिसंचरण चांगले होत नाही, कारण आपण जेव्हा एका पायावर दुसरा पाय ठेवता तेव्हा दोन्ही पायांमध्ये रक्त परिसंचरण एकसारखे होत नाही. यामुळे पाय सुन्न होतात किंवा पायाला मुंग्या येतात.

संधिवात होऊ शकतो
कार्यालयीन खुर्चीवर दररोज ८ ते ९ तास क्रॉस बसण्यामुळे सांध्यामध्ये वेदना होऊ शकतात. हे टाळण्यासाठी थोडा वेळ आपल्या बसण्याची स्थिती बदलत राहावी, असे केल्याने शरीरात हालचालही राहते आणि थकवादेखील जाणवत नाही. त्यामुळे ऑफिस असो की घर असे बसणे टाळावे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post