कोरोनाचा धसका : राळेगणसिध्दीत पर्यटकांना नो एन्ट्री


माय अहमदनगर वेब टीम
पारनेर - देशातील कोरोनाचा वाढता संसर्ग पाहाता आदर्श गाव राळेगण सिद्धीतील नागरिकांनी आव्हान केले आहे की जोपर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव आहे तो पर्यत कुणीही राळेगण सिद्धीला भेट देऊ नये असे त्यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.

ग्रामविकासाचे कार्य पहाण्यासाठी देशातील विविध राज्यातुन व देश विदेशातुन पर्यटक येत असतात त्यात विशेष करून आण्णांना भेटने, पहाणे त्याच्या बरोबर फोटो काढणे याची उत्सुकता जास्त असते सध्या जगभरात कोरोना हा संसर्गजन्य रोग पसरत आहे. महाराष्ट्रात कोरोनाने शिरकाव केला आहे.

कोरोना हा संसर्गजन्य रोग असल्याने आणि जीवघेणा असल्याने संसर्ग होऊ नये यासाठी आम्ही राळेगण सिद्धी परीवाराने निर्णय घेतला आहे. हा रोग आटोक्यात येईपर्यंत राळेगण सिद्धीमध्ये पर्यटक व्हिजीटर यांनी भेट देऊ नये. आजपर्यंत राळेगणला 16 लाखापेक्षा जास्त पर्यटक राज्य.देश विदेशातुन आलेले आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post