अखेर आयपीएल 2020 तुर्तास रद्द



माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - देशातील कोरोना व्हायरसच्या संकटामुळे अखेर आयपीएल 2020 लांबणीवर पडला आहे. 29 मार्चपासून सुरू होणारी 13 वी आयपीएल टुर्नामेंट अखेर पुढे ढकलण्यात आली आहे. बीसीसीआयने 15 एप्रिलला आयपीएल सुरू होणार असल्याचे माहिती दिली आहे. यासंबंधी सर्व संघांना सूचना देण्यात आल्या आहेत.

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, स्पर्धा रद्द होण्याऐवजी पुढे ढकलणे योग्य होते. आम्ही याबाबत बैठक घेतली आणि अखेर टुर्नामेंट 15 एप्रिलला सुरू करण्याच ठरले. सरकारने बुधवारी काही अधिकाऱ्यांव्यतिरिक्त इतर सर्वांनाच 15 एप्रिलपर्यंत व्हिसा नाकारला होता. तसेच, दिल्लीत आयपीएलचे सामने होणार नसल्याचे दिल्ली सरकारने शुक्रवारीच स्पष्ट केले होते. याबाबत आता बीसीसीआय आणि आयपीएल संघांच्या मालकांमध्ये बैठक होणार आहे.

फ्रेंचाइजीच्याएका अधिकाऱ्याने सांगितले की,दर्शकांशिवायसामने खेळण्यास आम्ही तयार आहोत, पण आम्हाला आमचेपरदेशी खेळाडू संघात हवे आहेत.15 एप्रिलपासून आयपीएल सुरू होणार असल्याचे आम्हाला माहिती आहे, पण परदेशी खेळाडूंना त्यावेळेस परवानगी असेल का नाही, याबाबत आम्हाला माहिती मिळायला हवी. संघात परदेशी खेळाडून नसल्यास आयपीलमध्ये रंगत येणार नाही,असे त्यांचे म्हणने आहे.

आयपीएलच्या 8 संघांमध्ये 189 खेळाडून, यात 64 परदेशी
आयपीएलच्या 8 संघांमध्ये 189 खेळाडू आहेत. यात 64 परदेशी आहेत आणि त्यापैकी 60 सध्या भारतात नाहीत. दक्षिण आफ्रीकेतीलचार खेळाडूक्विंटन डीकॉक, फाफ डू प्लेसिस, लुंगी एनगिडी, डेविड मिलर 3 वन-डेसीरिजसाठी भारत दौऱ्यावर आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post