केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ


माय अहमदनगर वेब टीम
बिझनेस डेस्क- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेमध्ये संसदेत झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत केंद्रीयय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) 4 टक्के वाढ झाली आहे. या वाढीनंतर डीए 21 टक्के झाला. याचा देशातील 48 लाख कर्मचाऱ्यांना आणि 65 लाख पेंशनर्सला फायदा होणार आहे.

किती फायदा होईल
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये 4 टक्क्यांच्या वाढीसोबत त्यांच्या दर महिन्यांच्या पगारात 720 ते 10,000 रुपये प्रती महिन्यांची वाढ होईल. केंद्र सरकारने आधीच म्हटले होते की, महागाई भत्ता (डीए) आणि महागाई मदत (डीआर) 1 जानेवारी 2020 पासून केंद्र सरकारच्या कर्मचारी आणि पेंशनर्सला मिळणार आहे. ही वाढीव रक्कम या महिन्यापासून लागू होईल.

यापूर्वी 2019 मध्ये 5 टक्के वाढ झाली होती
यापुूर्वी 10 ऑक्टोबर 2019 ला केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 5 टक्के वाढ झाली होती. त्यानंतर भत्ता 12 वरुन 17 टक्के झाला आहे. महाहाई भत्ता आणि महागाई मदत दरवर्षी एक जानेवारी आणि एक जुलैला दिली जाते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post