.. बिल भरायला शिका
माय अहमदनगर वेब टीम
कर्जत -मुलींकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होणार नाही, असा कायदा आम्ही आणत आहोत. पोलिसांच्या कारवाईत कोणी हस्तक्षेप करणार नाही. जे खराब काम करतील, त्यांना काळ्या यादीत टाकले जाईल, असे सांगत विधानसभा आणि लोकसभेतही महिलांना आरक्षण द्यावे, अशी मागणी करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी सांगितले. महसूल विभागाच्या महाराजस्व अभियानांतर्गत लाभ वितरणाचा कार्यक्रम माहिजळगाव येथे झाला. आमदार रोहित पवार यांच्या पुढाकाराने झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री हसन मुश्रीफ होते.
अजित पवार पुढे म्हणाले, शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तथापि, याबाबत जादूची कांडी फिरवल्यासारखी लगेच कामे होणार नाहीत. जरा सबुरीने घ्या. शेतकऱ्यांनो, वीज बिल भरायला शिका. महावितरणवर ४५ हजार कोटींचे कर्ज आहे. राज्यातील वीज पंप लवकरच सौरऊर्जेवर आणणार आहोत, असेही त्यांनी या वेळी सांगितले
Post a Comment