सातव्या जागेसाठी महाविकास आघाडीत खलबते, यांचे नाव आघाडीवर
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - राज्यसभेच्या सातव्या जागेची रणनीती ठरवण्यासाठी सोमवारी शिवसेना नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. तर दुसरीकडे काँग्रेसनेही ही जागा मिळावी म्हणून प्रयत्न सुरू केल्याने महाविकास आघाडीत ही जागा नेमकी कोणाच्या वाट्याला येणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.
राऊत म्हणाले, महाविकास आघाडी ठरल्याप्रमाणे राष्ट्रवादी राज्यसभेच्या दोन जागा लढणार आहे. राज्यसभेत शिवसेना आणि राष्ट्रवादीची अधिक मते आहेत. त्याखालोखाल काँग्रेसची मते आहेत. त्यामुळे सातवी जागा आम्ही जिंकू शकतो. सातव्या जागेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात चर्चा झालेली आहे. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला गेली असून राष्ट्रवादीने माजी मंत्री फौजिया खान यांच्या नावाची घोषणा सुद्धा केली असल्याचे त्यांनी सांगितले.
चंद्रकांत खैरेंचे नाव आघाडीवर
शिवसेनेच्या वाट्यास जी एक जागा आली आहे, त्यात शिवाजीराव आढळराव, प्रियंका चतुर्वेदी, चंद्रकांत खैरे इच्छुक आहेत. खैरे यांचे राज्यसभेवर पुनर्वसन केले जाऊ शकते, असा शिवसेनेतील सूत्रांचा अंदाज आहे.
Post a Comment