माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारने राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकरी कर्जमाफी जाहीर केली. मात्र, त्यानंतर विरोधकांनी सावकारी कर्जमाफी होणार का, या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरले होते. त्यानंतर आता सरकारने सावकारांनी त्यांच्या परवान्यात नमूद केलेल्या क्षेत्राच्या बाहेरील शेतकऱ्यांना दिलेले कर्जही माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.
- मराठवाडा-विदर्भातील शेतकऱ्यांसाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, या दोन्ही विभागांतील शेतकऱ्यांचे सावकारी कर्जही माफ होणार आहे. यासंदर्भातला शासन निर्णय पणन आणि वस्त्रोद्योग मंत्रालयाने ५ मार्च रोजी जाहीर केला आहे. शासन निर्णयानुसार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून कर्ज घेतले असेल, तर सरकारकडून त्या संबंधित सावकारास रक्कम अदा करण्यात येणार आहे. दरम्यान, सरकारने केलेल्या सावकारी कर्जमाफीचा शेतकऱ्यांमधून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. कर्जमाफी झाल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वर्ग होण्यास सुरुवात झाली आहे.
Post a Comment