परीक्षा रद्द ; परीक्षा न देताच पास होणार हे विद्यार्थीमाय अहमदनगर वेब टीम
मुंबई - राज्यात कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या पाहता पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता रद्द करण्यात आल्या आहेत. त्या सर्वांनाच परीक्षा न घेता पुढील वर्गात पाठवले जाणार आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्री वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी यासंदर्भातील माहिती जारी केली. तत्पूर्वी महाराष्ट्रात कोरोनामुळे सर्व खासगी आणि सरकारी शाळांना 31 मार्च पर्यंत सुट्या जाहीर करण्यात आल्या होत्या.

शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पुढील वर्गांच्या परीक्षांची सुद्धा माहिती दिली. त्यानुसार, 9 वी आणि 11 वीच्या परीक्षा आता 15 एप्रिल 2020 या तारखेनंतरच आयोजित केल्या जाणार आहेत. सोबतच, 10 वी वर्गाचे शिक्षक वगळता इतर वर्गाला शिकवणाऱ्या शिक्षकांना घरातून काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. 10 वीच्या परीक्षा सुरू असताना शाळा आणि परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 10 वीच्या विद्यार्थ्यांच्या दोन विषयांचे पेपर अजुनही झालेले नाहीत. या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार घेतल्या जाणार आहेत. हा निर्णय केवळ एसएससी बोर्डाच्या परीक्षांसाठी लागू राहील असेही शिक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

शिक्षकांनी मागितली घरी पेपर तपासणीची परवानगी
तर दुसरीकडे, शिक्षक संघटनांनी 10 वीच्या परीक्षांचे पेपर घरीच तपासण्यासाठी द्यावेत अशी मागणी केली आहे. सरकारने सुद्धा सरकारी कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या 50 टक्के केली आहे. तसेच खासगी क्षेत्रांमध्ये सुद्धा वर्क फ्रॉम होमची सुविधा दिली जात आहे. परंतु, वर्क फ्रॉम होम आणि पेपर तपासणी हे विषय वेगळे असल्याने त्याला बोर्ड किंवा सरकारकडून परवानगी मिळण्याची शक्यता फार कमी आहे. असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिव्य मराठीशी बोलताना सांगितले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post