शेतकर्‍यांच्या आत्महत्येला सर्वच पक्ष जबाबदार


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - सीएए व एनआरसी यासारखे विषय काढून शेतकर्‍यांच्या असलेल्या समस्यांकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करत आहे, असा घणाघाती आरोप शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला. ज्या शेतकर्‍यांना दीडपट हमीभाव देऊ, असे म्हणून मोदी सत्तेवर बसले, मात्र आजतागायत हा विषय ते सोडू शकले नाहीत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. शेतकर्‍यांच्या आत्महत्येला सर्वच पक्ष जबाबदार आहेत, असेेेही ते म्हणाले.

शेतकरी संघटनेच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या तयारी करता नगर येथे विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. रघुनाथदादा पाटील म्हणाले, आज शेतकर्‍यांचे अनेक प्रश्न आहेत. पण त्याऐवजी सध्या एनआरसी संदर्भात चर्चा सुरू आहे. शेतकरी आत्महत्या कडे दुर्लक्ष व्हावे, यासाठी जनतेसमोर चघळण्यास काहीतरी विषय पाहिजे, म्हणून असे विषय सुरू आहे. आर्थिक प्रश्नावरून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा हा एक प्रकारे असून अपयश झाकण्यासाठी असे प्रकार सुरू आहेत. यामुळेच ग्रामीण भागामध्ये त्यांचा आता खुळा वाजत नाही, असा टोला पाटील यांनी मोदी सरकारला लगावला आहे.

शेतकर्‍यांच्या मालाला हमीभाव देऊन यासाठी स्वामीनाथन समितीची शिफारस करण्यात आली. काँग्रेसने सुद्धा त्याकडे दुर्लक्ष केले. ज्या भाजप सरकारने 2014 साली आम्ही सत्तेवर आल्यावर दीडपट हमीभाव देऊ म्हणून मोदींनी आश्वासन दिल. पण बहुमत असताना देखील त्यांना हा विषय मार्गी लावता आला नाही. काँग्रेस आणि भाजप यांच्या आर्थिक धोरणांमध्ये काडीमात्र फरक राहिला नाही, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. आम्ही शेतकर्‍यांच्या प्रश्नासाठी अनेक पक्षांना मदत केली. मात्र आमच्या पाठीमागे कोणी उभे राहायला तयार नाही. मात्र उद्योगपतींच्या भांडवलावर अनेक राजकीय पक्ष निवडणुका लढवत आहे, व सरकार कोणाचे आणायचे याचे धोरण त्यांच्याकडूनच आखले जाते व ते सरकार पुढे येते, असे सांगत त्यांनी पक्षांवर टीका केली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post