तलाठ्याने कामात हलगर्जीपणामुळे शेतकरी अनुदानापासून वंचित


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- नगर तालुक्यातील खोसपुरी ग्रामस्थांनी सोमवार दि. २ मार्च रोजी कामगार तलाठ्यास घेराव घालून चांगलेच धारेवर धरले.

गावामध्ये तलाठी व कोतवालाच्या हलगर्जीपणामुळे शेतकरी अतिवृष्टीच्या अनुदानापासून वंचित राहिल्याचा आरोप यावेळी ग्रामस्थांकडून करण्यात आला. सुमारे १०० ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. त्यांनी तलाठी व कोतवालाच्या मनमानी कारभाराचा पाढाच वाचला.

याबाबत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. कामगार तलाठी हे कायम कामावर हजर राहत नाहीत त्यामुळे शुल्लक कामासाठी शेतकऱ्यांना दिवस-दिवस तलाठी कार्यालयात बसून राहावे लागते.गावातील कोतवाल ही मनमानी कारभार करत असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. मूळ यादी प्रसिद्धीस दिली गेली नाही त्यामुळेच अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित राहीले असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे. तरी दोषींवर कारवाई करावी अन्यथा रस्ता रोको करण्याचा इशारा सरपंच सोमनाथ हारेर, चेअरमन भीमराव आव्हाड, व्हा.चेअरमन फकिरभाई पठाण, तंटामुक्ती अध्यक्ष विजय भिसे, अर्जुन भिसे, संतोष हारेर, अण्णासाहेब पाटील, संचालक कचरू देवकर, माजी सरपंच ज्ञानदेव भिसे, रभाजी देवकर, प्रल्हाद भिसे, दत्तात्रय भिसे यांनी तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post