धक्कादायक ; आजीबाईंवर तरुणाचा अत्याचार


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - जागतिक महिला दिनी नगर तालुक्यातील आंबिलवाडी येथे माणुसकीला काळिमा फासणारी व दुर्घटना घडली. शेतात काम करत असलेल्या 85 वर्ष वयाच्या वृध्द महिलेवर 27 वर्ष वयाच्या तरुणाने अक्षरशः लचके तोडत अत्याचार करत बेशुध्द पाडले. पोलिस व आरोग्य प्रशासनानेही या दुर्घटनेकडे सुरुवातीला दुर्लक्ष केले. पदाधिकारी व ग्रामस्थांच्या रेट्यानंतर पोलिसांनी रात्री उशिरा एका संशयिताला ताब्यात घेतले.

रविवारीमहिला दिनानिमित्त सर्वत्र महिलांच्या कर्तुत्वाबद्दल चर्चा सुरु आहे. नगर व बीड जिल्ह्याच्या सरहद्दीवरील आंबिलवाडी शिवारात सुमारे 85 वर्ष वयाची वृध्द महिला शेतात काम करत होती. त्याचवेळी एका तरुणाने या महिलेच्या मागून येत तिच्यासोबत अश्लिल चाळे सुरु केले. वृध्द महिलेने आरडाओरड सुरु केल्यानंतर या तरुणाने तिला गलोरीचा धाक दाखवत तिच्यावर अत्याचार सुरु केला. वृध्द महिलेला विवस्त्र करत त्या नराधम तरुणाने तिच्या गालाचे अक्षरशः लचके तोडले. महिलेची वस्त्रे रक्ताने माखली होती. शेवटी ती वृध्द महिला बेशुध्द पडली. नराधम तरुण तेथून निघून गेला. दुपारच्या सुमारास त्याठिकाणी गुरे चारण्यासाठी आलेल्यांनी विवस्त्र आजीबाई शेतात पडलेल्या पाहिल्या. घटनेचे गांभिर्य ओळखून ग्रामस्थांनी दुपारच्या सुमारास या वृध्द महिलेला नगर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. नगर तालुका पोलिसांनाही घटनेची माहिती देण्यात आली. खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी सिव्हील ह़ॉस्पिटलला नेण्यास सांगितले.

जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आल्यानंतर सुरुवातीला या आजीबाईंकडे ना पोलिस फिरकले ना डॉक्टर. जिल्हा रुग्णालयात जमलेले रुईछत्तीशी, आंबिलवाडी येथील शेकडो तरुण प्रशासनाच्या विरोधात प्रक्षोभक झाले होते. पंचायत समितीचे उपसभापती किरण भापकर, जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे माजी सभापती बाळासाहेब हराळ यांनी घटनास्थळी येऊन अधिका-यांना घटनेचे गांभिर्य सांगितल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा हलली. नगर तालुका पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक शंकरसिंग राजपूत यांना वृध्द महिलेने सांगितलेल्या वर्णनानुसार पोलिसांनी आंबिलवाडी गावातून एका तरुणाला ताब्यात घेतले. या तरुणाने गुन्ह्याची कबुली दिल्याचे सांगण्यात येते. सदरची वृध्द महिला उपचारास प्रतिसाद देत असल्याचे वैद्यकीय सुत्रांनी सांगितले. दरम्यान याबाबत पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून काहीही सांगण्यास नकार देण्यात आला.

महिला दिनीच पाशवी अत्याचाराची दुर्घटना घडल्याने प्रचंड चीड व्यक्त केली जात आहे.




0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post