इराणमध्ये कोरोनाचे एकाच दिवसात ४९ जणांचा मृत्यू


माय अहमदनगर वेब टीम
तेहरान -इराणमध्ये गेल्या चाेवीस तासांत काेराेनाच्या संसर्गामुळे एकाच दिवसात ४९ जणांचा मृत्यू झाला. नाेव्हेल काेराेनामुळे एवढ्या माेठ्या संख्येने मृत्युमुखी पडलेल्यांची ही इराणमधील माेठी घटना मानली जाते.

इराणच्या आराेग्य मंत्र्यांनी ही माहिती जाहीर केली. फेब्रुवारीच्या मध्यावर काेराेनाची बाधा झाल्याने इराणमध्ये मृतांची संख्या झपाट्याने वाढत हाेती. काेराेनामुळे १९४ जणांचा मृत्यू झाला. काेराेना संसर्गाची सुरुवात झालेल्या चीननंतर परदेशात सर्वाधिक मृत्यू संख्या इराणमध्ये असल्याचे सांगितले जाते. इराणमधील ३१ प्रांतांत काेराेनाची बाधा झालेल्यांची संख्या ६ हजार ५६६ वर पाेहाेचली आहे. दुसरीकडे इटलीत १.६ काेटी लाेकांना स्वतंत्र ठेवण्याची कवायत सुरू करण्यात आली आहे. सरकारने गेल्या आठवड्यात सर्व शाळा, महाविद्यालयांना १० दिवसांची सुटी देण्यात येत असल्याचे जाहीर केले हाेते. पंतप्रधान गियुसेपे काेंटी यांनी काेराेनावर नियंत्रण मिळवण्यासाठी खासगी तसेच सार्वजनिक ठिकाणी हाेणारे आयाेजन स्थगित करण्याचे आदेश दिले हाेते. सरकारने या आदेशाची तीन एप्रिलपर्यंत लागू करण्यात यावे, असेही स्पष्ट केले हाेते. युराेपात काेराेना व्हायरसचे सर्वाधिक प्रकरणे इटलीत आहेत. शनिवारपर्यंत संसर्ग झालेल्यांची संख्या ४ हजार ६३६ वर पाेहाेचली आहे, तर मृतांची संख्या २३०हून जास्त झाली आहे. इटलीत गेल्या २४ ताासंत काेराेनामुळे ५० हून जास्त लाेकांचा मृत्यू झाला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post