गोळीबार करणारे 'ते' आरोपी ६ तासात गजाआड


माय अहमदनगर वेब टीम
जामखेड - येथे गोळीबार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न करणारे दोन आरोपींना ६ तासात अटक करण्यात जामखेड पोलिसांना यश आले आहे. विकास बाबासाहेब थोरात, विशाल मगर असे पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत समजलेली माहिती अशी की, विकास थोरात व विशाल मगर (दोघे रा.सावरगाव, ता.जामखेड) यांनी जामखेड येथे बीड रस्त्यावर बाळू दादा डोके (रा.भुतवडा ता.जामखेड) याला १५ दिवसांपूर्वी त्यांच्या भावाबरोबर झालेल्या भांडणाच्या कारणावरून थोरात याने बाळू डोके याला पिस्टलमधून गोळी मारुन ठार मारण्याचा प्रयत्न केला, अशी फिर्याद डोके याने जामखेड पोलीस ठाण्यात दिली होती, त्याची दखल घेत मिळालेल्या माहितीनुसार सापळा लावून डोनगाव परिसरातून आरोपी थोरात व मगर याना अवघ्या ६ तासात पोलिसांनी जेरबंद केले.

प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील, कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेडचे पो.नि. प्रभाकर पाटील, सपोनि अवतारसिंग चव्हाण, पोना रुदय घोडके, पोकाँ सागर जंगम आदिंच्या पथकाने ही कारवाई केली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post