अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही; अफवांवर विश्वास ठेवू नका : जिल्हाधिकारी


दुबईवरुन परतलेल्या ’त्या’ चौघांची तपासणी मात्र, लक्षणे नाहीत

माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- नगर शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झालेला एकही रुग्ण आढळलेला नाही, त्यामुळे नागरीकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, जिल्हा प्रशासन सर्व प्रकारची खबरदारी घेत आहे. घाबरून जावू नये असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी नागरिकांना केले आहे.

दुबईहून व इतर ठिकाणवरुन राज्यात परतलेल्या लोकांची यादीच समाजमाध्यमांवर व्हायरल झाली. यामध्ये नगर शहरातील चौघेजण दुबई ट्रिपवरुन परतलेले असल्याचे समोर आले. प्रशासनाने त्यांची खबरदारी घेत चौघांना शोधून तपासणी केली. मात्र, त्यांच्यामध्ये कोणतेही लक्षणे आढळली नसल्याचा दावा करण्यात आला आहे. एकंदरीतच नगर जिल्ह्यात बुधवार (दि.11) पर्यंत एकही कोरोनाग्रस्त रूग्ण आढळून आलेला नाही अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.

तसेच नागरीकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये नागरिकांनी अफवांना बळी न पडता आरोग्याची काळजी घ्यावी, परिसर स्वच्छ ठेवावा, प्रशासन सज्ज असून प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देण्यात येत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post