ऑस्ट्रेलियाकडून भारताचा दारुण पराभव ; संघ अवघ्या 99 धावांवर ऑल आउट


माय अहमदनगर वेब टीम
मेलबर्न- महिला टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून भारताचा दारुण पराभव झाला. मेलबर्नमध्ये झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला 185 धावांचे टार्गेट दिले होते. हे लक्ष गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघ फक्त 99 धावांची मजल मारू शकला. भारतीय संघाचे चार खेळाडू अवघ्या 30 धावांच्या आतच आउट झाले.

स्मृती मंधाना 11 आणि जेमिमा रोड्रिग्ज शून्यावर पवेलियनमध्ये परतली. तर टुर्नामेंटमध्ये आपल्या दमदार प्रदर्शनाने सर्वांना आश्चर्यचकीत करणारी युवा खेळाडू शेफाली वर्मा फक्त 2 धावांवर आउट झाली.

सामन्यात टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाने 4 विकेट्स गमावून भारताला 184 धावांचे टार्गेट दिले. ऑस्ट्रेलियाची ओपनर एलिसा हिलीने 75 आणि बेथ मूनीने नाबाद 78 धावांची खेळी केली. हे हिलीच्या करिअरमधील 12वा आणि मूनीचा 9वा अर्धशतक आहे. भारताच्या दिप्ती शर्माने 4 ओवरमध्ये 38 धावांवर 2 विकेट्स घेतल्या.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post