दक्षिण कोरियातील बाधितांची संख्या पोहोचली १ हजारावर, सरकारही हादरले


माय अहमदनगर वेब टीम
सेऊल - चीनच्या बाहेर दक्षिण कोरियातील कोरोना बाधितांची संख्या १ हजारावर पोहोचली आहे, अशी माहिती राष्ट्रपती मून जे-इन यांनी दिली आहे. मंगळवारी नवीन १४४ बाधित आढळून आले. चीनबाहेरील बाधितांची ही सर्वात मोठी संख्या आहे.

वास्तविक जगातील १२ वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था अशी ओळख असलेल्या दक्षिण कोरियात त्यामुळे चिंता निर्माण झाली आहे. देशातील चौथे मोठे शहर देएगू व शेजारील गेआँग शहरात हा संसर्ग वाढल्याचे सांगण्यात आले. परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. देएगू शहराची लोकसंख्या सुमारे २५ लाख आहे. येथील मेडिकल दुकानांवर मास्कसाठी रांगाच रांगा लागल्याचे दिसून येत आहे.

कोरियन एअर या कंपनीच्या विमानातील एक कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आला होता. त्या कर्मचाऱ्याबद्दलचा तपशील मात्र देण्यात आला नाही. अमेरिकेने नागरिकांना दक्षिण कोरियाचा शक्य असल्यास रद्द करण्याचा सल्ला दिला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post