राज्यसभेच्या 55 जागांसाठी 26 मार्च रोजी होणार मतदान, त्याचदिवशी येणार निकाल


माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - राज्यसभेच्या 55 सदस्यांचा कार्यकाळ यावर्षी एप्रिलमध्ये संपणार आहे. निवडणूक आयोगाने 17 राज्यांच्या राज्यसभेच्या जागांसाठी मंगळवारी मध्यावधी निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली आहे. 6 मार्चपासून निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे. 26 मार्ज रोजी बॅलेट पेपरच्या आधारे मतदान होणार आहे. याच दिवशी संध्याकाळी 5 वाजता निकालाची घोषणा केली जाणार आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक 7, यानंतर तमिळनाडूत 6 आणि पश्चिम बंगालमध्ये 5 जागा रिकाम्या होणार आहेत.
राज्य आणि राज्यसभेतील रिक्त जागा
महाराष्ट्र-7,ओडिशा-4,तमिळनाडू-6,पश्चिम बंगाल-5,आंध्र प्रदेश-4,तेलंगाना-2,आसम-3,बिहार-5,छत्तीसगड-2,गुजरात-4,हरियाणा-2,हिमाचल प्रदेश-1,झारखंड-2,मध्य प्रदेश-3,मणिपूर-1,राजस्थान-3,मेघालय-1,
निवडणूक आयोगानुसार, 6 मार्च रोजी नामांकन प्रक्रिया सुरू होईल. तर 13 मार्च ही अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. यानंतर 16 मार्च रोजी आलेल्या अर्जांची छाननी होईल. उमेदवार 18 मार्चपर्यंत आपले नामांकन मागे घेऊ शकतात.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post