जपानी क्रूझवर आणखी 4 भारतीय संक्रमित, चीनचे अधिवेशन स्थगित


माय अहमदनगर वेब टीम
​​​​​बीजिंग - जपानमधील भारतीय वकिलातीने सांगितले की, डायमंड क्रूझवर आणखी चार भारतीय कोरोना व्हायरसने संक्रमित झाले आहेत. क्रूझवर आतापर्यंत १२ भारतीयांमध्ये संसर्गाची पुष्टी झाली आहे. घातक कोरोना व्हायरसमुळे चीनने संसदेचे वार्षिक अधिवेशन स्थगित केले आहे. देशातील सर्वाेच्च कार्यपालिका नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या स्थायी समितीच्या बैठकीत एनपीसीचे वार्षिक अधिवेशन स्थगित करण्याच्या मसुद्याला मंजुरी देण्यात आली. शासकीय माध्यमानुसार १३व्या एनपीसीच्या तिसऱ्या वार्षिक अधिवेशनाला ५ मार्चपासून सुरुवात होणार होती.

दरम्यान, कोरोनाच्या संसर्गामुळे मरणाऱ्यांची संख्या २ हजार ५९२ झाली आहे, तर ७९ हजारांपेक्षा जास्त संक्रमित आहेत. चीनच्या अधिकाऱ्यांनी वुहानचे रहिवासी नसणाऱ्यांना शहर सोडून जाण्यास परवानगी दिली आहे. अशा लोकांना वुहानमधून जाण्यास परवानगी देण्यात येणार आहे, ज्यांच्यात आजाराची लक्षणे नाहीत तसेच ज्यांचा रुग्णांशी कोणताही संपर्क झालेला नाही.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post