हा फक्त भारताचा एक पराभव, याने शेवट नाही ठरत


माय अहमदनगर वेब टीम
​​​​​वेलिंग्टन - यजमान न्यूझीलंडने सलामीच्या कसाेटीत एकतर्फी विजयाची नाेंद केली. मात्र, काही तज्ञ हा भारताचा सर्वात माेठा पराभव असल्याचा बागुलबुवा करत अाहेत. त्यांचा हा समज चुकीचा अाहे. कारण हा भारताचा फक्त एक पराभव अाहे, भारताचा शेवट नाही , अशा शब्दांत टीम इंडियाचा कर्णधार काेहलीने टीकाकारांना चपराक दिली.

सामनावीर टीम साउथी (५/६१) अाणि ट्रेंट बाेल्ट (४/३९) यांनी यजमान न्यूझीलंड संघाला साेमवारी भारताविरुद्ध पहिल्या कसाेटीत सनसनाटी विजय मिळवून दिला. या दाेघांच्या शानदार गाेलंदाजीच्या बळावर न्यूझीलंड संघाने सलामीच्या कसाेटीत भारतावर १० गड्यांनी मात केली. न्यूझीलंड संघाने दाेन कसाेटी सामन्यांच्या मालिकेत १-० ने अाघाडी घेतली. दुसऱ्या निर्णायक कसाेटीला येत्या शनिवारपासून सुरुवात हाेणार अाहे. भारतीय संघ १६ कसाेटीनंतर दाेन्ही डावांत २०० धावांचा अाकडा गाठण्यात अपयशी ठरला. टीमला पहिल्या डावात १६५ व दुसऱ्या डावात १९१ धावांवर गाशा गुंडाळावा लागला. यापूर्वी २०१८ मध्ये यजमान इंग्लंड संघाविरुद्ध लाॅर्ड््सच्या मैदानावर भारतीय संघ दाेन्ही डावांत २०० धावा करण्यात अपयशी ठरला हाेता.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post