पण स्वातंत्र्य चळवळीत भाजप किंवा तेव्हाचा ‘संघ’ परिवार कोठे होता?माय अहमदनगर वेब टीम
मुंबई -  विधानसभेत स्वातंत्र्यवीर सावरकर (veer savarkar) गौरव प्रस्ताव आणून महाविकास आघाडीतील शिवसेनेची कोंडी करू पाहणाऱ्या भाजपवर शिवसेनेनं जबरदस्त हल्ला चढवला आहे. 'भाजपला वीर सावरकरांचा आलेला पुळका खोटा आहे. वीर सावरकरांचे स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान होतेच, पण स्वातंत्र्य चळवळीत भाजप किंवा तेव्हाचा ‘संघ’ परिवार कोठे होता?,' असा बोचरा सवाल शिवसेनेनं दैनिक 'सामना'तून (Saamana) केला आहे.

महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस पक्षाची सावरकरांविषयीची भूमिका वेगळी आहे. त्यामुळं सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्तानं भाजपनं काल विधानसभेत सावरकर गौरव प्रस्ताव आणून सरकारकडं ठराव करण्याची मागणी केली. त्यातून आघाडीत विसंवाद वाढण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, विधानसभा अध्यक्षांनी नियमावर बोट ठेवून हा प्रस्ताव फेटाळला आणि भाजपचा डाव फसला. मात्र, भाजपच्या या भूमिकेमुळं शिवसेना  संतापली आहे. 'सामना'च्या आजच्या अग्रलेखातून भाजपवर जोरदार टीका करण्यात आली आहे.


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post