बजेटमध्ये महाराष्ट्र कुठे आहे? महसूलमंत्री थोरात यांचा सवाल





माय अहमदनगर वेब टीम
मुंबई  - आज जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र कोठे आहे? सर्वाधिक कर देणाऱ्या मुंबई आणि महाराष्ट्राची घोर निराशा मोदी सरकारने केली आहे. मोदी सरकारला महाराष्ट्राचे वावडे आहे का? अशी प्रतिक्रिया महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. ट्विटरवर पोस्ट करत त्यांनी केंद्रीय बजेटवर टीका केली.

रेल्वेचे नवीन उपक्रमांचे खाजगीकरण करण्याचे सूतोवाच अर्थमंत्र्यांनी केले आहे, या अगोदरही अनेक फायद्यात चालणारे सार्वजनिक उपक्रम मोदी सरकारने खासगी क्षेत्राला आंदण दिले आहेत, भारताला नव्या ईस्ट इंडिया कंपन्यांच्या ताब्यात देण्याचा सरकारचा डाव आहे का?

आयडीबीआय बँक आणि एलआयसी मधील स्वतःचा हिस्सा सरकार विकणार आहे, त्यामुळे सर्वसामान्यांच्या ठेवी सुरक्षित राहणार आहेत का? देशाची अर्थव्यवस्था अडचणीत असल्याचे हे लक्षण आहे, सरकार मात्र हे स्विकारायला तयार नाही. असे त्यांनी म्हटले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post