अहमदनगर- तालुक्यातील खारेकर्जुने येथे बॉम्ब निकामी करत असताना बॉम्बचा स्फोट होऊन एक जण ठार झाा. भिवा सहादू गायकवाड असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना आज सकाळी के.के. रेंज हद्दीत माळरानावर घडली.
खारेकर्जुने येथील परीसरात लष्करी के. के. रेंज आहे. येथे दारू गोळ्याचे प्रशिक्षण चालते. यामध्ये बॉम्ब गोळयाचा सराव केला जातो. हे निकामी झालेले बॉम्ब गोळा करण्यासाठी ठेकेदाराची नियुक्त केली आहे. मात्र, खारेकर्जुने येथील ग्रामस्थ या ठेकेदारांची जर चुकून लष्करी हद्दीमध्ये शिरून हे बॉम्ब गोळा करतात. असाच प्रकार आज घडला. निकामी झालेले बॉम्ब गोळा करण्यासाठी येथील भिवा गायकवाड गेला होता. त्यांना भरलेला बॉम्ब सापडला. तो माळरानावर फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा स्फोट झाला. त्यात त्याचा मृत्यू झाला. आत्तापर्यंत बरेच जण अशा घटनेने मरण पावलेले आहेत.
Post a Comment