जामिया विद्यापीठाबाहेर पुन्हा गोळीबार
माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - जामिया विद्यपीठाच्या बाहेर रविवारी रात्री अज्ञातांनी गोळीबार केल्याची घटना घडली. यामध्ये कोणालाही इजा झाली नाही. येथून काही अंतरावर नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आंदोलन सुरू होते. स्कूटीवर आलेल्या हल्लेखोरांनी विद्यापीठाच्या गेट क्रमांक 5 वर हा गोळीबार केला. पोलिसांनी प्रत्यक्षदर्शींच्या निवेदनावरून एफआयआर नोंदवला आहे. यापूर्वी, जामिया आणि शाहीन बाग भागात गोळीबार होण्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनानंतर निवडणूक आयोगाने रविवारी रात्री डीसीपी दक्षिण-पूर्व चिन्मय बिस्वाल यांची बदली केली.
यापूर्वी 30 जानेवारी रोजी एका हल्लेखोराने जामिया भागात सीएए विरोधात मोर्चा काढणाऱ्या लोकांवर गोळीबार केला होता. यानंतर 1 फेब्रुवारी रोजी शाहीन बागेत एकाने हवेत गोळीबार केला होता. गेल्या चार दिवसांत निषेध स्थळांजवळ गोळीबाराची ही तिसरी घटना आहे.
एसीपींनी सांगितले की, पोलिसांचे एक पथक घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज घेण्यास जाणार आहे. यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल. एफआयआरमध्ये प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवण्यात आले आहे. त्यानुसार, रविवारी रात्री 11:30 वाजता जामियाच्या गेट नंतर-7 कडून स्कूटीवरून दोन जण आले. स्कूटीवर मागे बसलेल्याने गेट नंबर-5वर गोळीबार केला. यानंतर हल्लेखोर होली फॅमिली हॉस्पिटलकडे फरार झाले. रिपोर्ट्सनुसार हल्लेखोर लाल रंगाच्या स्कुटीवर आले होते. एका युवकाने लाल रंगाचे जॅकेट घातले होते.
Post a Comment