महिलेला घरात घुसून पेटवले




माय अहमदनगर वेब टीम
औरंगाबाद - हिंगणघाट येथील जळीत कांडाची घटना ताजी असतानाच आता औरंगाबाद जिल्ह्यातही अशी एक घटना घडली आहे. सिल्लोड तालुक्यातील अंधारी गावात एका 50 वर्षीय महिलेला पेटवले. यात महिला 95 टक्के भाजली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनीआरोपीला केली अटक

औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातील अंधारी गावात घरात घुसून महिलेला पेटवल्याची घटना घडली आहे. या घटनेत 50 वर्षीय महिला 95 टक्के भाजली असून तिच्यावर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी आरोपी संतोष मोहितेला अटक करण्यात आली आहे. संतोष मोहितेने महिलेच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले. तो गावात बिअरबार चालवतो. दरम्यान आरोपीने महिलेला का पेटवले यामागचे कारण अदयाप समजू शकले नाही.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post