उपजिल्हाधिकारी शाहुराव मोरे यांना निवडणूक आयोगाचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 मध्ये निवडणुकीचे संचलन तसेच आदर्श आचारसंहितेचे संदर्भात सर्वोत्कृष्ट काम केल्याबद्दल राज्य निवडणुक आयोगाकडुन नेवासा विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी शाहुराव मोरे यांनी उत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दल उत्कृष्ठ अधिकारी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक, 2019 ची निवडणुक निर्भय, मुक्त व पारदर्शी वातावरणात पार पडली आहे. या निवडणुकीसाठी राज्यातील निवडणुकीचे काम केलेले सर्व अधिकारी/कर्मचारी यांनी त्याच्या कामकाजाप्रती दिलेले योगदान विचारात घेऊन या निवडणुकीसाठी प्रभावी व उत्कृष्ट कामगिरी केलेल्या जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, उपजिल्हाधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी, निवडणुक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी यांना पुरस्कार जाहीर केले आहेत. त्यात नाशिक विभागात नेवासा विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी शाहुराव मोरे यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post