साडेनऊ लाखाचे टायर लंपास


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- टायरच्या दुकानाचे पाठीमागील बाजुचे पत्रे उचकाटून अज्ञात चोराने आतील 9 लाख 46 हजार रुपये किंमतीचे टायर्स चोरुन नेले. ही घटना मंगळवारी (दि.25) पहाटेच्या सुमारास नगरपुणे रोडवरील केडगाव शिवारातील हॉटेल अरुणोदय शेजारी अरिहंत टायर्स येथे घडली.

याबाबतची अधिक माहिती अशी की, प्रितेश संजय बाफना (वय 25, रा.समर्थनगर, व्यंकटेश मार्केट जवळ, लिंकरोड, केडगाव) यांचे टायरच्या दुकानाचे पाठीमागील पते कोणीतरी अज्ञात चोराने उचकाटून आत प्रवेश केला व आतील एम.आर.एफ. कंपनीचे 120, मिसलीन कंपनीचे 40, सी.एट. कंपनीचे 140, राल्को कंपनीचे 40, टिव्हीएस कंपनीचे 40, मारुती कंपनीचे 30 असे 470 नवीन टायर त्याचबरोबर अपोलो कंपनीचे 30, जे.के. कंपनीचे 4, लिंगलॉंग कंपनीचे 3, सीएट 3, एमआरएफ टायर 5 असे 45 टायर आणि 620 दुचाकी ट्युब्स् व 100 चारचाकीच्या ट्युब असे 9 लाख 46 हजार रुपयांचे साहित्य चोरुन नेले.

या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी प्रितेश बाफना यांच्या फिर्यादीवरुन भारतीय दंड विधान कलम 457, 380 प्रमाणे घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास कोतवाली पोलीस हे करीत आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post