महापालिकेच्या रक्तपेढीची अवस्था पाहून महापौर संतापले, महापौर म्हणाले...


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- रक्तपेढी सुरु करण्याबाबत महापालिकेत झालेल्या बैठकीत सूचना देऊनही कर्मचार्‍यांनी त्याची अंमलबजावणी न केल्याने महापौर बाबासाहेब वाकळे यांनी येथे उपस्थित असलेल्या कर्मचार्‍यांना चांगलेच धारेवर धरुन जाब विचारला. यावेळी भाजपाच्या शिष्टमंडळाने रक्तपेढीच्या दुरावस्थेसाठी आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगेच जबाबदार असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी महापौरांकडे केली.

बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटलमधील महानगरपालिकेच्या रक्तपेढीचा कारभार पूर्ववत होऊन या ठिकाणाहून रक्त सुविधा मिळाव्यात यासाठी ज्येष्ठ नेते वसंत लोढा यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने काही दिवसांपूर्वी आंदोलन केले होते. या आंदोलनाची दखल घेत महापौर बाबासाहेब वाकळे यांनी महानगरपालिकेत अधिकारी व भाजपाच्या पदाधिकार्‍यांची बैठक घेऊन अधिकार्‍यांना तातडीने रक्तपेढी पुर्ववत चालू करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. मात्र अद्याप रक्तपेढीचे काम सुरळित न झाल्याने महापौर बाबासाहेब वाकळे यांनी भाजपाच्या शिष्टमंडळासह अचानक रक्तपेढीला भेट देऊन सद्य परिस्थितीची पाहणी केली.

महापौर बाबासाहेब वाकळे यांनी रक्तपेढीचा कारभार पाहून संताप व्यक्त केला. नियुक्त असलेले कायम कर्मचारी गैरहजर होते. तसेच कंत्राटी कामगारही उपस्थित नव्हते, त्यामुळे महापौरांनी हजेरी पत्रक पाहिले असता, दि.14 फेब्रुवारी 2020 पासून कर्मचार्‍यांनी रजिस्टरवर सह्याही केलेल्या नाहीत. त्यामुळे महापौर वाकळे यांनी स्वत: सर्व कर्मचार्‍यांची गैरहजरी नोंदविली. याबाबत रक्तपेढीचे अधिकारी डॉ.शंकर शेडाळे यांना मोबाईलवर संपर्क साधला असता, त्यांनी फोन उचलला नाही. त्यानंतर संपूर्ण रक्तपेढीची पाहणी केली. बंद असलेल्या मशिनरीबद्दल उपस्थित कर्मचार्‍यांना जाब विचारला. मात्र कर्मचार्‍यांनी टेक्निशियन नसल्याने सर्व अत्याधुनिक मशिनरी बंद असल्याचे सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post