'तो' वादग्रस्त व्हिडीओच युट्युबवर उपलब्ध नाही ; इंदोरीकर महाराजांना दिलासा


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर : गेले अनेक दिवसांपासून वादग्रस्त ठरलेले निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्या कीर्तनाचा तो वादग्रस्त व्हिडिओ युट्यूबवर उपलब्ध नसल्याने, पुराव्याअभावी महाराजांना दुसरी नोटीस देता येणार नाही अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक प्रदीप मुरंबीकर यांनी दिल्याने, इंदोरीकर महाराजांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. महाराजांच्या कीर्तनातील संततीप्राप्तीबाबत विधानामुळे वाद निर्माण झाला होता. गेल्या पंधरा दिवसांपासून मोर्चे आंदोलने सुरू होती. अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या सदस्यांनीही याबाबत आक्रमक भूमिका घेवून महाराजांवर कारवाईची मागणी केली होती. तर भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी नगर पोलिस अधीक्षकांना निवेदन देऊन महाराजांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

तर अंधश्रद्धा निर्मुलन समिती आणि तृप्ती देसाई यांच्या विरोधात महाराजांच्या समर्थकांनीही आंदोलने व मोर्चे काढून रोष व्यत केला. परंतु आता या घटनेला एक वेगळेच वळन आले आहे. ज्या घटनेमुळे हे सर्व प्रकरण तापले होते तो video चं युट्यूबवरून गायब झाल्याने, जोपर्यंत पुरावा मिळत नाही तोपर्यंत दुसरी नोटीस देता येणार नाही असे जिल्हा शल्यचिकित्सकांनी म्हंटले आहे. त्यामुळे तूर्तास का होईना महाराजांना दिलासा मिळाला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post