संत भगवानबाबांची रायफल व तलवार चोरीला


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - पाथर्डी तालुक्यातील भगवान बाबा गडावर असलेल्या व भगवान बाबांच्या वापरातील वस्तूंच्या संग्रहातील २ बोअरची रायफल व एक तलवार चोरीला गेल्याची घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान पाथर्डी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून ते पुढील तपास करत आहेत.

सदरची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. या संदर्भात पाथर्डी पोलीस स्टेशनला प्राथमिक माहिती देण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक राठोड हे भगवान गडावर गेले असून सध्या तेथील सी सी टीव्ही फुटेज मधे तीन संशयीत आरोपी दिसत आहेत पाथर्डी पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. सदरची रायफल ही भगवान बाबा वापरत होते. हा प्रकार गुरुवारी उजेडात आल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमुळे भगवान गडावरील सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post