रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने बदलले संघाचे नाव
माय अहमदनगर वेब टीम - इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)मधील रॉयल चॅलेंजर्स बंगळरू(आरसीबी)ने आपल्या सर्व सोशल मीडिया अकाउंट्सवरुन प्रोफाइल आणि कव्हरसह सर्व फोटो काढून टाकले आहेत. टीमने आज(गुरुवार) ट्वीट करत सांगितले की, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि यूट्यूबवरुन सर्व फोटो काढून टाकले आहेत. या गोष्टीची माहिती संघाचा कर्णधार विराट कोहलीला दिली नाही. यासोबतच आरसीबीने आपले नावही बदलून फक्त "रॉयल चॅलेंजर्स" केले आहे. यावर कोहलीने आश्चर्य व्यक्त केले आहे.
न्यूजीलँड दौऱ्यावर असलेल्या कोहलीने आज ट्वीट केले की, "पोस्ट काढून टाकण्यात आल्या आणि याबाबत कर्णधाराला काहीच माहिती नाही. आरसीबी, काही मदत लागत असेल तर सांगा." आरसीबीने 2008 आतपर्यंत एकही आयपीएल जिंकला नाहीये.
टीमच्या या कृत्यावर लेग स्पिनर युजवेंद्र चहलनेही आश्चर्य व्यक्त केले आहे. त्याने ट्वीट केले, "अरे आरसीबी, ही कोणती गुगली आहे? तुमची प्रोफाइल फोटो आणि इंस्टाग्राम पोस्ट कुठे गेल्या?"
Post a Comment