राजकीय पक्षांना 'सुप्रीम' धक्का


माय अहमदनगर वेब टीम

नवी दिल्ली- गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना निवडणुकीत उमेदवारी कशी दिली याचे कारण वेबसाइटवर जारी करावे लागेल. निवडणूक सुधारणासंदर्भात सुप्रीम कोर्टाने गुरुवारी सर्वच राजकीय पक्षांना हे आदेश दिले आहेत. हे उमेदवार कोण होते, आणि त्यांच्यावर कोणत्या स्वरुपाची गुन्हेगारी प्रकरणे सुरू आहेत याची संपूर्ण माहिती आता सर्व राजकीय पक्षांना द्यावी लागणार आहे. चीफ जस्टिस एस. ए. बोबडे आणि बी. आर. गवई यांच्या खंडपीठाने भाजप नेते आणि वकील अश्विनी कुमार उपाध्याय यांच्या जनहित याचिकेवर हे आदेश दिले. उल्लेखनीय बाब म्हणजे, गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना निवडणूक लढवण्यापासून रोखण्यासाठी तशा स्वरुपाचे आदेश जारी करावे असे निर्देश सुप्रीम कोर्टाने 25 नोव्हेंबर रोजी दिले होते. तीन महिन्यांच्या आत राजकीय पक्षांना अशा लोकांना उमेदवारी देण्यापासून रोखता येईल असा कोर्टाच्या निर्देशांचा हेतू होता.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post