हिवरेबाजार इतकेच संस्कार केडगावमधून मिळाले - पद्मश्री पोपटराव पवार
केडगावमध्ये नागरी सत्कार । केडगावमधील आजोळच्या बालपणींच्या आठवणींना दिला उजाळा
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर: दिवाळी आणि उन्हाळ्यातील सुट्टीतील मजा, केडगावमधील शालेय शिक्षण ,क्रिकेटचे वेड , पोहणे , वेगवेगळ्या मळ्यात भटकणे , गप्पांचा फड जमवणे , केडगावची ग्रामपंचायत निवडणूक , जुने बाल सवंगडी अशा एक ना अनेक बालपणीच्या आठवणी सांगत मामाचे गाव असणाऱ्या केडगावमधील स्मृतींना पद्मश्री पोपटराव पवार यांनी उजाळा दिला .
पवारांचे आजोळ असणाऱ्या केडगावमध्ये त्यांचा पद्मश्री पुरस्कार जाहिर झाल्याबद्दल नागरी सत्कार ठेवण्यात आला होता. यावेळी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे उपस्थीत होते .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार संग्राम जगताप होते . यावेळी सर्वश्री रावसाहेब सातपुते , गोविंद कोतकर ,रामदास येवले , अंबादास गारूडकर , बाजीराव कोतकर ,बबनराव कोतकर , बाळासाहेब टेकाडे , सुभाष महाराज सुर्यवंशी , जयद्रथ खाकाळ, शशिकांत आठरे,नगरसेवक मनोज कोतकर , सुनील कोतकर ,जालिंदर कोतकर , गणेश ननवरे , लता शेळके आदि उपस्थीत होते .
यावेळी पोपटरावांनी केडगावमधील आपल्या बालपणीच्या व महाविद्यालयीन आयुष्यातील काही महत्त्वाच्या घटनांना उजाळा दिला . ते म्हणाले शालेय शिक्षणाबरोबर जीवन जगण्याचे खरे शिक्षण केडगावमध्येच मिळाले .आमच्या सर्व भावंडाचे शिक्षण व बालपण केडगावमध्येच गेले .केडगावमधील सर्व मळ्यामध्ये आम्ही फेरफटका मारत असु . खरे संस्कार केडगावमध्येच मिळाले .पोहणे ,क्रिकेट खेळणे , गप्पा मारत बसणे , वाचण करणे असा कितीतरी बालपणीच्या आठवणी त्यांनी सांगुन पर्यावरणाचे बिघडलेले संतुलन यावर चिंता व्यक्त करून हे थांबले नाही तर भविष्य भवावह असेल याची जाणिव करून दिली .
यावेळी पोपटराव पवार यांच्या सारख्या सामाजीक काम करणाऱ्या लोकांची च आज समाजाला गरज आहे . युवकांनी प्रेरणा घ्यावी असे काम त्यांनी उभे केले आहे .
स्वागत माजी सरपंच प्रभाकर गुंड यांनी केले .प्रास्तावीक योगेश गुंड यांनी तर सुत्रसंचालन सुनील जगदाळे यांनी केले . यावेळी विविध संघटनांच्या वतीने पवार यांचा सत्कार करण्यात आला .कार्यक्रम यशस्वीतेसाठी किसन सातपुते , विजय कोतकर , विठ्ठल कोतकर , महेश गुंड , भूषण गुंड , संतोष गायकवाड रमेश कोतकर आदींनी परिश्रम घेतले .
Post a Comment