तपोवन रोडला घरफोड्या ; कॅटबरी चॉकलेटचे बॉक्स चोरीला


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – बंद घराचे कुलूप तोडुन दरवाजातुन आत प्रवेश करून अज्ञात चोरांनी घरातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा 52 हजारांचा ऐवज चोरून नेला. तसेच मेडिकल दुकान फोडुन 2 हजारांचे कॅटबरी चॉकलेटस् चोरून नेले. ही घटना तपोवन रोडवरील कसबे व वस्ती ढवण वस्ती येथे मंगळवारी (दि.11) पहाटेच्या सुमारास घडली.

याबाबतची अधिक माहिती अशी की, गणेश विजयकुमार पाथरकर (वय-32, रा.द्वारा-गणेश ज्ञानेश्‍वर अटकरे, लक्ष्मी कॉलनी, भिस्तबाग महालाजवळ, कसबेवस्ती) हे त्यांच्या आईची प्रकृती खराब असल्याने त्यांच्या गावी गेले असता पहाटेच्या सुमारास त्यांच्या घराचे दरवाजाचे कुलूप तोडुन अज्ञात चोराने घरातील सामानाची उचकापाचक करून कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने व 34 हजार रोख व 2 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे ओम व 8 हजार रूपये रोख असा ऐवज चोरून नेला. त्यानंतर चोरट्यांनी ढवणवस्ती येथील साई मेडिकलकडे आपला मोर्चा वळविला. मेडिकल दुकानाचे शटरचे कुलुप तोडून आतील 2 हजार रूपये किंमतीचे कॅटबरीचे बॉक्स चोरून नेले.




या प्रकरणी गणेश पाथारकर यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 457, 380 प्रमाणे घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. अधिक तपास महिला पोलिस नाईक शाहिन पठाण या करीत आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post