विधानसभेच्या मैदानानंतर आ. रोहीत पवार यांच्याविरुद्ध माजी मंत्री राम शिंदे यांचा आता कायदेशीर लढा




निवडणूक याचिकेत आ.रोहीत पवार यांना हायकोर्टाची नोटीस

माय अहमदनगर वेब टीम

औरंगाबाद: कर्जत-जामखेड मतदार संघातील पराभूत उमेदवार आणि माजी मंत्री रामदास शिंदे यांनी आमदार रोहीत राजेंद्र पवार यांच्याविरोधात पुन्हा एकदा शड्डू ठोकले आहेत. निवडणूक आखाड्यातील पराभवानंतर शिंदे यांनी आ. पवार यांच्याविरोधात कायदेशीर लढा सुरु केला आहे. मतदारांना आमिषे आणि प्रलोभने दाखवून आ. पवार विजयी झाल्याचा आरोप करणारी निवडणूक याचिका त्यांनी हायकोर्टात दाखल केली आहे. सुनावणीअंती न्या. एस. एम. गव्हाणे यांनी आ.रोहीत पवार यांच्यासह इतर उमेदवारांना नोटीस बजावली. याचिकेवर १३ मार्च रोजी पुढील सुनावणी होईल.

माजी मंत्री रामदास शिंदे यांच्यासह नामसाधर्म्य असलेले अपक्ष उमेदवार रोहीत राजेंद्र पवार यांनी निवडून आलेले आ.रोहीत राजेंद्र पवार यांच्याविरोधात या दोन निवडणूक याचिका दाखल केलेल्या आहेत. त्यानुसार, कर्जत-जामखेड मतदार संघातून शिंदे दोनदा निवडून आलेले आहेत. मात्र या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. राष्ट्रवादी पक्षाने रोहीत पवार यांना त्यांच्याविरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात उभे केले होते. साम-दाम-दंड-भेद याप्रकाराचा वापर करत त्यांचा पराभव करण्यात आला.




काय आहेत आरोप

रोहीत पवार यांना निवडून आणण्यासाठी बारामती अ‍ॅग्रो लिमिटेडच्या कर्मचाºयांना मतदारसंघात राबविण्यात आले. त्यांनी मतदारांना आमिषे आणि प्रलोभने दाखविली. काही ठिकाणी हजार रुपये वाटण्याचे प्रकार उघडकीस आले. तसेच शिंदे यांची व्हाट्सअपवरुन बदनामी करण्यात आली. पवार यांनी निवडणूक खर्च लपविला. या दोन्ही याचिकांवर एकत्रित सुनावणी झाली असता, सर्व आरोपांना सिद्ध करण्यासाठी तपशीलही जोडण्यात आल्याचे म्हणणे याचिकाकर्त्यांचे वकील सतीश तळेकर यांनी मांडले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post