अक्षर पहाल तर पाहतच रहाल ; ज्ञानेश्‍वरी व शिवांजलीच्या हस्ताक्षराची जिल्ह्याला भुरळ


ज्ञानेश्‍वरी भुजबळ किलबिल गटात प्रथम तर शिवांजली चोभे बालगटात द्वितीय । जिल्हा परिषदेत झाला सत्कार

माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर - जिल्हा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध गुणदर्शन स्पर्धेत जिल्हा परिषद पप्राथमिक शाळा बाबुर्डी बेंद केेंद्र- अकोळनेर, ता. नगर शाळेच्या विद्यार्थीनींने घवघवीत यश संपादन केले आहे. शाळेची विद्यार्थीनी ज्ञानेश्‍वरी भिमराज भुजबळ हिने किलबिल गटात जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला. तसेच याच शाळेतील विद्यार्थीनी शिवांजली निलेश चोभे हिने बालगटात जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळविला. या विद्यार्थीनींच्या हस्ताक्षराचे सर्वत्र कौतुक होत आहे. यशस्वी विद्यार्थीनींना शाळेच्या मुख्याध्यापिका उषा सुरेश धामणे तसेच उपमुख्याध्यापिका शुभांगी दत्तात्रय घोडके-लोटके यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.


यशस्वी विद्यार्थीनींचे जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्रीताई घुले, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके, सभापती सुनील गडाख, काशिनाथ दाते, मीरा शेटे, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, अनिल कराळे, माधवराव लामखडे, शिक्षणाधिकारी रमाकांत काटमोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच उपशिक्षणाधिकारी धामणे, अकोळनेर केेंद्राचे केंद्रप्रुख जाधव यांनी चिुकल्यांचे कौतुक केले.


 ज्ञानेश्‍वरी व शिवांजली हिचे सरपंच दिपक साळवे, उपसरपंच अण्णा चोभे, शाळा समितीचे अध्यक्ष डॉ. सुधीर चोभे, पत्रकार सचिन चोभे, ग्रामपंचायत सदस्य संदीप चोभे, युवराज चोभे, वैभव खेंगट, हॉटेल राजवीरचे संचालक मनोज चोभे शरद चोभे, लहू कासार, महेश चोभे, पोपट चोभे, शंकर चोभे, अंकूश चोभे, अंबादास साठे, उद्धव चोभे, वाल्मिक चोभे, ज्ञानेश्‍वर चोभे, महादेव चोभे यांच्यासह अंगणवाडी सेविका-मदतनीस यांनी अभिनंदन केले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post