अहमदनगरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ


पोलिस चौकी व गस्ती वाढविण्याची पोलिस अधीक्षकांकडे मागणी

माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- कल्याण रोड परिसर हा शहराच्या अत्यंत जवळचा भाग आहे. त्यामुळे या परिसरामध्ये नोकरदार, कामगार, व्यापारी यांची मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे. गेल्या महिन्याभरापासून चो़र्‍यांचे व घरफोड्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसभर काम करायचे व रात्री चोरांच्या भितीमुळे रात्रभर जागायचे. यामुळे मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यासाठी या भागात पोलिस चौकी सुरु करावी व पोलिसांची गस्त मोठ्या प्रमाणात वाढावी व चोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नगरसेवक सचिन शिंदे, शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक संजय शेंडगे, नगरसेवक अनिल शिंदे यांच्यासह या भागातील नागरिकांनी शहर पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे केली आहे.

कल्याण रोड परिसरामध्ये गेल्या महिनाभरापासून चो़र्‍यांचे व घरफोड्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्याचा बंदोबस्त लवकरात लवकर व्हावा, यासाठी शहर पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली. यावेळी नगरसेवक सचिन शिंदे, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक संजय शेंडगे, अनिल शिंदे, दिनकर आघाव, पारुनाथ ढोकळे, संजय सातपुते, सुनील शिंदे, उत्तम राजळे, सतीश गिते, सुनील नन्नवरे, शशिकांत तांबे, विठ्ठल अलवाल, अनिल राऊत, अशोक घोरपडे, बाबासाहेब कोतकर, संजय गोसावी, विजय वाघ, आदम शेख, अमर अगरवाल, नारायण पिसे, सुनील राऊत, साळवे मच्छिंद्र, संजय भापकर, शिवाजी सोगडे, बाळासाहेब भापकर, संतोष शिंदे, अविनाश पांढरे, प्रदीवन सोनवणे, रितेश आडेप, रुपेश महावीर, निलेश झरकर, सागर सुरटे, भानुदास गवळी, दीपक ओसवाल, सिद्धार्थ पाचोलकर, अशोक सुद्रीक, अभय ढहाळे, गोपीनाथ कोरडे, सुदाम परभणे, नानासाहेब शिंदे, परमेश्वर सातपुते आदी उपस्थित होते.
या परिसरात विद्या कॉलनी, समतानगर, पावन म्हसोबानगर, हॅपी थॉट, आदर्शनगर, गणेशनगर, रायगड हाईटस्, आनंद पार्क, सुयोग पार्क, अनुसयानगर, माधवनगर, अमितनगर, जाधवनगर, रेया पार्क, वंदेमातरम् पार्क, जिजाऊनगर, भावनाऋषी सोसायटी, शिवाजीनगर येथे सरकारी वर्ग मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत. याचाच फायदा घेत चोरटे हे दिवसाढवळ्या शेजारील घरास कड्या लावून बंद घरांचे कुलूप तोडून घरफोडी करत आहेत व रात्री तर ते हत्यारांसह वावरताना नागरिकांना आढळत आहेत. त्यामुळे नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण होत आहे. नागरिकांना पोलिसांकडून मदतीची अपेक्षा आहे. हा भाग कोतवाली व तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत आहे. तरी पोलिस चौकी व मोठ्या प्रमाणात गस्ती वाढावी, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post