मनपात तक्रार दिल्याच्या कारणावरुन एकास मारहाण


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- महापालिकेतील आईस्क्रीम प्लॉटचे तक्रार केल्याचे मनात राग धरुन सहा जणांनी शिवीगाळ व दमदाटी करत लाथा- बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना औरंगाबाद रोडवरील तवले नगर येथे घडली.

याबाबतची अधिक माहिती अशी की, मंगेश जानपा तवले (वय 32, रा.वसंत टेकडी, तवलेनगर) याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, महानगरपालिकेत दिलेल्या तक्रारीच्या कारणावरुन मनात राग धरुन विष्णू बुधवंत, रामनाथ बुधवंत, राहुल बुधवंत व त्याची पत्नी, आई, विष्णू बुधवंत याचा मुलगा यांनी शिवीगाळ व दमदाटी करीत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच मंगेश तवले याच्या आईस व पत्नीसही लाथा-बुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ करीत धमकी दिली.

या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी मंगेश तवले यांच्या फिर्यादीवरुन भा.दं.वि.क. 143, 147, 148, 149, 324, 323, 504, 506 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास साहायक फौजदार मरकड हे करीत आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post