कामरगावजवळ वाहनाच्या धडकेत आजी व नातीचा मृत्यू
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीवरील ५५ वर्षिय महिलेसह साडेतीन वर्षाची मुलगी ठार झाल्याची घटना नगर-पुणे रोडवरील कामरगाव शिवारातील स्माईल स्टोन जवळ शुक्रवारी (दि.३१) रात्री ८ वाजल्याच्या सुमारास घडली.
याबाबतची अधिक माहिती अशी की, मधुकर ठोकळ (वय ५८, रा.कामरगाव, ता.नगर) हे त्यांची पत्नी आशा मधुकर ठोकळ (वय ५५, रा.कामरगाव, ता.नगर) व त्यांची नात ईशा अमोल ठोकळ (वय - साडेतीन वर्ष) यांच्यासह त्यांच्या दुचाकीवरुन नगर कडून कामरगावकडे जात असतना रमाईल स्टोन जवळ समोरुन येणाऱ्या भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. या धडकेत आशा ठोकळ व ईशा ठोकळ यांचा मृत्यू झाला तर मधुकर ठोकळ हे किरकोळ जखमी झाले. अपघात होताच अज्ञात वाहन चालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला. घटनास्थळावरील नागरिक अपघात होताच मदतीकरीता धावले. त्यांनी जखमींना औषधोपचाराकरीता जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आशा ठोकळ व ईश ठोकळ मृत झाल्याचे सांगितले.
या प्रकरणी नगर तालुका पोलिसांनी मिळालेल्या माहितीवरुन सी.आर.पी.सी. १७४ प्रमाणे अकस्मात मृत्युची नोंद केली असून अधिक तपास पो.ना.मरकड हे करीत आहेत. शनिवारी (दि.१) दुपारी या आजी नातीवर कामरगाव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
Post a Comment