हिंगणघाट प्रकरणी 2 ते 3 दिवसात आरोप पत्र दाखल करणार - गृहमंत्री


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई : हिंगणघाट येथील शिक्षक महिलेवर पेट्रोल टाकून जाळणाऱ्या आरोपीवर येत्या 2ते 3दिवसात आरोप पत्र दाखल करण्यात येणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं.

३ फेब्रुवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास पीडितेवर हिंगणघाट येथील नंदोरी चौकात पेट्रोल टाकून जाळण्यात आले होते. उपचारादरम्यान तिचा नागपुरातील एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. या प्रकरणी हिंगणघाट पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपी विकेश ऊर्फ विक्की नगराळे याला अटक केली.वर्ध्याचे पोलीस सुपेरिटेंडंट या प्रकरणी अधिक तपास करत आहेत, तर विषेश सरकारी वकील उज्वल निकम या प्रकरणी पीडिते ची बाजू मांडणार आहेत..
मही लावरील अत्याचार आणि हल्ल्यांच्या घटना थांबवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. आरोपींना तातडीनं आणि कठोर शिक्षा करण्यासंदर्भात आंध्र प्रदेश सरकारनं कायदा केला आहे. तसा कायदा राज्यात करण्याच्या अनुषंगानं आंध्र प्रदेशात गेलो होतो. माझ्यासोबत वरिष्ठ अधिकारीही होते. तो कायदा नीट समजून घेतला आहे. दिशा कायदा महाराष्ट्रात करण्यासाठी आणि अधिक सुधारित स्वरूपात लागू करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. दिशा सारखा कायदा आणण्याचा मानस राज्य सरकारचा आहे. आरोपीला लवकरात लवकर शिक्षा देण्याचं काम हा कायदा करेल,” अशी माहिती देशमुख यांनी दिली.या साठी मंगळवारी महिला मंत्री, महिला पत्रकार तसेच विधानसभा अध्यक्ष आणि विधानपरिषद सभापती यांची संयुक्त बैठक होणार आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post