गॅस महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी आक्रमक


घरगुती सिलेंडरच्या दरात १४६ रुपये तर व्यावसायिक सिलेंडरच्या दरात २२६ रुपयांची वाढ
माय अहमदनगर वेब टीम -महागाईच्या भडक्यात सर्वसामान्य होरपळून निघत असताना त्यात आता गॅस कंपन्यांनी सिलेंडरच्या दरवाडीत भरमसाठ वाढ केली आहे. घरगुती सिलेंडरच्या दरात १४६ रुपये तर व्यावसायिक सिलेंडरच्या दरात २२६ रुपयांची वाढ या गॅस कंपन्यांकडून करण्यात आली. ही दरवाढ लागू झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला झळ पोहचू लागली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य माणसाचं जीवनमान जगणे ही मुश्किल झाले आहे. याचा निषेध म्हणून नगर शहर जिल्हा
राष्ट्रवादी कांग्रेस महिलेच्यावतीने दिल्लीगेट येते स्टोव्ह पेटवून व गॅसच्या टाकीला हार घालून निषेध करण्यात आला. 

यावेळी शहर जिल्हा महिलाध्यक्षा रेशमा आठरे, सुनंदा कांबळे, निर्मला जाधव, सायरा शेख, उषा सोनटक्के, शितल राऊत, सुनिता पाचारणे, मनिषा आठरे, लता गायकवाड, सारिका खताडे, शितल गाडे, नंदा कामत, गंगूबाई गवळी, फरिदा पठाण, वर्षा मैड, शितल चांदणे, संगिता रोकडे, सीमा ठोकळ, सुनंदा पवार, पायल मानकर, अनिता पारदे, निकिता अवघडे, अलिशा पारदे आदी महिला उपस्थित होत्या.

ही दरवाढ गेल्या काही महिन्यातील सर्वाधिक दरवाढ आहे. गेल्या महिन्यात घरगुती गॅस दर ७0३ रुपये होते तर ते आता
८४९ रुपयेवर गेले असून ग्राहकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची झालेली घसरण आणि आंतरराष्ट्रीय बाजार गॅसच्या दरात झालेल्या वाढीमुळे ही दरवाढ झाले आहे. केंद्र सरकारकडून कुठलेही आर्थिक धोरणाबाबत योग्य निर्णय घेतले जात नसल्यामुळे नागरिकांना महागाईला सामोरे जावे लागत आहे. सर्वसामान्य जनतेचे जीवनमान जगणेही मुश्किल झाले आहे. यामुळे आम्ही केंद्र सरकारचा व गॅस कंपन्यांचा निषेध करत असल्याचे आठरे म्हणाले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post